अकुलखेडा ता.चोपडा जि.जळगाव
gpakulkhede@gmail.com
अकुलखेडा ता.चोपडा जि.जळगाव
gpakulkhede@gmail.com
सुचना :
अकुलखेडा हे गाव महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एक प्रगतीशील गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या ४७४३ आहे.गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्र ६ ,समाज मंदिर २, पाणीसाठवण सार्वजनिक विहीर इ. सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावात लक्ष्मीनारायण मंदिर देवस्थान हे नागरीकांचे श्रद्धास्थान आहे. गावात महादेव मंदिर ,शनी मंदिर व हनुमान मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून जास्तकरून कापुस मका, ज्वारी ,बाजरी, हरभरा व गहू सह प्रमुख पिके घेतली जातात. मका, कापुस व कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकयाांना चांगले उत्पन्न जमळते.
अकुलखेडा ग्रामपंचायतीत विवीध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो कुटुंबांना घराचा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतरगत अकुलखेडा गावात वैयक्तिक शौचालयांचा लाभ दिलेला आहे .
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १३ सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
🌾ग्रामपंचायत क्षेत्रफळ(चौ.किमी. मध्ये)
🏢 वार्ड संख्या
👥 पुरुष संख्या
👥 स्त्री संख्या
👥 कुटुंब संख्या
👥 एकूण लोकसंख्या
महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात अकुलखेडा हे गाव आहे. हे गाव उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील आहे. हे गाव जिल्हा मुख्यालय जळगाांव पासून ७० किमी अंतरावर आहे, चोपडा पासून ५ किमी आणि राज्याची राजधानी मुंबईपासून ५०० किमी. आहे.
अकुलखेडा गावाला पोस्ट ऑफीसला जोडनेत आलेले आहे. आणि पोस्ट मुख्य कार्यालय अकुलखेडा येथे आहे.
चहार्डी , चुंचाळे ,चोपडा जवळची गावे आहेत.
अकुलखेडा हे गाव साधे, कष्टप्रधान आणि पारंपरिक जीवन शैलीसाठी ओळखले जाते. शेती हा गावकरींचा मुख्य व्यवसाय असून, कांदा. मका, कापुस, आणि विविध हंगामी भाजीपाला यांची लागवड केली जाते.
गावात सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक परंपरा दृढपणे जपल्या जातात.वर्षभर साजरे होणारे सन उत्सव ग्राम दैवतांची पूजाअर्चा तसेच मरी आई यात्रा उत्सव हा गावाच्या एकात्मतेचे प्रतिक मानले जाते. येथे आदिवासी परंपरा आणि संस्कृती चे जतन केले जाते. होळी, गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र इत्यादी सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
येथील लोक ‘अतिथी देवो भाव, ह्या मूल्यांना आचरणात आणणारे आहेत. येथील लोक मेहनती लोक आहेत. तरून पिढी शिक्षण, खेळ व रोजगाराच्या संधी शोधून प्रगतीकडे वाटचाल करत आहे. अकुलखेडा लोकजीवनात धार्मिक संस्कृती व पारंपारिक ग्रामीण जीवनमान आढळून येते. अकुलखेडा गावाची विकासाकडे वाटचालीचे कार्य उत्तम असे सुरु आहे.
ग्रामदैवताचे मंदिर:-अकुलखेडा गावात लक्ष्मीनारायण मंदिरात गुरुपौर्णिमा च्या दिवशी संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने पूजा करतात.
अकुलखेडा गावात हनुमानाचे भव्य दिव्य असे मंदिर आहे. हनुमान मंदिर वस्तीची शोभा वाढवतात. व येथे धार्मिक कार्यक्रम होत असतात.
अकुलखेडा येथे गुरुदत्त मंदिर आहे व येथे ७ दिवस सप्ताह भरवला जातो कसे पोहचावे:-
कसे पोहचावे:-
अकुलखेडा या ठिकाणी येणेसाठी चोपडा येथून बस ने येता येते.
हागणदारी मुक्त गाव, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रम व अभियानात गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
श्री . योगेश दगडु पाटील
श्री. सचिन अशोकराव पाटील
श्री.अंनत नामदेव महाजन
श्री. रमेश सुकलाल पाटील
श्री विकास अरुण पाटील
सौ. वंदना शाम पाटील
सौ. आशा संदीप धनगर
सौ. ज्योती सुनिल धनगर
सौ. संगीता भानुदास पाटील
सौ. शोभाबाई सुरेश पाटील
सौ. अनिता दिपक पाटील
श्रीमती. गंगुबाई जगन्नाथ पाटील
श्री. वसंत दशरथ मोर
२) श्री. तिलेश पवार (ग्राम महसूल अधिकारी) मो.नं. ९५७९०९९७१०
३) श्री. सचिन भरत धनगर (पोलीस पाटील) मो.नं. ९९७५२४६९३४
४) श्री. दिपक शांताराम पाटील (सहाय्यक कृषी अधिकारी) मो.नं.७०२०९३२७७१